खरंतर प्रत्येक इराण्याला फळ खाणे श्वास घेण्या इतके महत्त्वाचे वाटते की काय

सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक टिप्पणी.

माझी बायको माझ्या कडे खास इराणी पद्धतीचे आश्चर्य व्यक्त करीत उभी होती, खालचा ओठ वरच्या दातांनी दाबितं चेहेर्‍यावर मिस्किल हास्य असते, मग दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर आपटून हनवटीच्या खाली धरायचे, मग तोंडाने म्हणायचे " बा: बा: चे खूब, दिघे ची मुन्धे ? बी हया "

सुंदर. डोळ्यासमोर चित्र उभें राहिलें.

सामानाची पेटी सामान हा नुसता शब्द पटला नाहीं. तें सुतारकामाचें, मर्तिकाचें, कसलेंही असूं शकतें. एक वात्रट अर्थ तर प्रत्येकालाच ठाऊक असतो.

शिक्षण, घर, राहणीमान फार महाग असल्याने तिलाच नाही तर बर्‍याच मुलींना / बायकांना देह व्यापार हाच एक कमाईचा व्यवसाय उरला आहे,

विषण्ण करणारें आहे. आतां परिस्थिती सुधारली असेल अशी आशा करूं या.

सुधीर कांदळकर