सोय यांच्याशी मी सहमत,
अमेरिकेत इथे बहुताव्न्श अमेरिकन लोकांना यू एस इंग्रजी शिवाय कोणतीच भाषा येत नाही. जेन्व्हा आम्ही मराठी मंडळी किंवा कोणीही परदेशस्थ एकत्र येऊन आपापली भाषा बोलतात, तेव्हा अनेकदा काही अमेरिकन मित्रांना वाईट वाटते तर काहींना कौतुक. अन म्हणून कोणी जगांतील इतर भाषा शिकायला जात नाहीत. इंग्रजी हि गरजेची झाली आहे म्हणून सगळे शिकतात, तसेच ज्यांची भाषाच इंग्रजी आहे त्यांना आपण सांगू का की तुम्ही आमची भाषा शिका? मग हिंदी मातृभाषा असलेल्यांना जर देशभर नुसते फिरण्यासाठी शिका म्हणण्यात काही अर्थ नाही, पण हे हि तितकेच खरे की जर ते दुसऱ्या राज्यांत जे लोक स्थायिक होणार असतील तर तिथली राज्यभाषा त्यांनी शिकायची तयारी दाखवलीच पाहिजे.
जर एकसंघ राष्ट्रभाषा म्हणून जर हिंदी अनेकांनी स्वीकारली असेल तर त्यात गैर काही नाही असे माझे मत आहे.
अनु, चांगला विषय!
धन्यवाद.