मैत्र-सुरवात-मग जाणिवपूर्वक ते वाढावेत-दृढ व्हावेत यासाठी घडणारे-घडविणारे संवाद, गुंतलेपण अन मग कुठेतरी साचलेपण-अन शेवटी रितेपणा.... श्रावण तुम्ही इतक्या निरनिराळ्या पातळीवरील होणारे संवाद अतिशय तरलतेने व सूक्ष्मतेने निरीक्षण करून मांडलेत. क्या बात हैं! प्रत्येकवेळी वाचताना अजून नवे काही समोर येईल. आठवेल..... बरेचदा संबंधात नक्की काय अपेक्षित आहे हे समजेतो तो संवादच संपतो अन मग उरते ती परछाई--जी कधीही सोडून जात नाही अन तिने जावे असे दोघांनाही वाटत नसतेच.