मला पण बोलायच आहे...... येथे हे वाचायला मिळाले:
ज्या मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसल्याची भाषा बाळासाहेब करत आहेत, त्या मराठी माणसाने तस का केल याच आत्मपरिक्षण करण्याचे कष्ट त्यानी घेतल्याचे दिसत नाहित. पराभव झाल्या बरोबर उलट-सुलट शब्दाचे वार मराठी माणसावर करण्याचे सत्र शिवसेनेने आरंभले आहे. (अर्थात, बाळासाहेबान्चा बोलविता धनी कोणी तरी दुसराच आहे हे १००% नक्की कारण बाळासाहेबानसारखा एक माच्युअर नेता आपल्या मायबाप मतदाराना उद्देशून असे बालीश विधान कधिहि करणार नाही हे त्रिवार सत्य आहे.) पण तस करताना त्यानी मराठी माणसाला काय आपल्या गोठ्यात बान्धलेली गाय समजले आहेत काय? ...