ऊर्मी येथे हे वाचायला मिळाले:

काल दुपारी सहजच मी जुने फोटो बघत होते. आमचं लग्न झाल्यानंतरचे फोटो... बाप रे नवरा किती बारीक दिसतो आहे आणि मी कसली बावळट दिसते आहे असे काही बाही कमेंट्स टाकत त्या फोटोंचं मी चविष्टपणे रसग्रहण करत होते :)... आणि एकापाठोपाठ एक अश्या अनेक कडु गोड आठवणी यायला लागल्या. कडु कमी आणि गोडच जास्त.

आमचं लग्न झालं तेव्हा मी आणि नवरा आम्ही दोघेही शिकत होतो. त्यामुळे मॅरीड स्टुडंट म्हणुन आम्हाला रहायाला घर मिळालं होतं. घर कसलं अगदी रानावनात असलेलं चंद्रमोळी (सिमेंटच) झोपडंच होतं. आजुबाजुला गर्द वनराई आणि सोबतिला असंख्य पक्षी आणि प्राणी. दोन ...
पुढे वाचा. : अल्बम