हाताशी कुठलीही सत्ता नसताना या माणसाने राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य चोख बजावले. वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे माध्यमांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मुद्द्यांपासून संघटनेला दूर ठेवले.
सरकारच्या कारभारावर अतिशय मुद्देसूदपणे टिका केली.
शिववडा सारख्या लोकोपयोगी योजनांना सुरुवात केली. गेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी सारख्या पक्षाला लोळविले.
यावेळी जातीय व आर्थिक समीकरणामुळे अपयश आले हे खरे आहे.
पण या राज्याला शांत, सयंमी, धोरणी व दूरदर्शी नेतृत्वाची गरज आहे. अन हे सर्व उद्धवकडे पुरेपूर आहेत.
आक्रमक पुढारी हे काही काळापुरते यशस्वी होवू शकत असतील परंतु ते राज्याची न भरून येणारी हानी करतात.
उद्धवनी याच मार्गावर पुढे चालावे, आज ना उद्या विजय निश्चितच आहे.