आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
वरवर पाहता अगदी साधा देखावा. संध्याकाळची वेळ. समुद्रकिनारा. दूरवर मुलांचा एक घोळका आरडाओरडा करीत पाण्यात खेळतोय. कॅमेराच्या अगदी जवळ दोन मुलं. जाडगेला पिगी(ह्यू एडवर्डस) आणि काटकुळा राल्फ (जेम्स ऑब्रे) दोघं आपसांत बोलताहेत. ते ज्याविषयी बोलताहेत ते मात्र त्यांच्या वयाला न शोभणारं. पिगी राल्फला सांगायचा प्रयत्न करतोय की, तो जमावाचा प्रमुख आहे. त्याने शंख फुंकावा आणि खेळणा-या मुलांना एकत्र जमवावं. राल्फ मात्र हे मान्य करीत नाही. तो म्हणतो, जर मी शंख फुंकला आणि मुलं आली नाहीत, तर मोठीच आपत्ती होईल. कारण मग या मुलांनी राल्फचा अधिकार पूर्ण ...