दोन नारळांचे पाणी आणि भरपूर ओले ताजे खोबरे घालून तासभर दडपून ठेवायचे. आहाहा.... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटले. भरपूर कोथिंबीर व हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि किसलेले आले व लिंबू. मी मात्र फोडणीत हळद घालत नाही. सुंदर होतात. शेंगदाणे हवेच आणि स्मिताने म्हटलेय तसे पोह्याचा पापड चुरडून टाकल्यास मस्त लागतात. एक वाटी खाऊन झाले की दुसऱ्यांदा घेताना पापड चुरून टाकायचा.

रोहिणी फोटो मस्तच व ध्वनिचित्रदर्शनही आवडले.