शब्द-पट म्हणजे कोडं.. येथे हे वाचायला मिळाले:
"सकाळी साडे-चारला तयार रहावे" असा हाय-कमांडचा आदेश आल्यापसून जराशी उत्सुकता होतीच पण सकाळी सॅम्या आणि राखुंड्या आपापल्या जांभया आवरीत मलाच विचारायला लागले "कुठे जायचे?" करून, तेव्हा तर ती आणखीनच वाढली. असा प्लॅन कुणाला आधीच नाही सांगीतला की आपले महत्व वाढते असे वाटते का काय या माकडाला? असू देत बुवा.. पाचच मिनीटात पहाटेच्या शांततेला चरे पाडत आपली बायको दामटवत के.डी हजर झाला. कुठल्यातरी चांगल्या स्वप्नातून उठून यायला लागलं असलं पाहिजे त्याला, आपण काहीतरी गौप्यस्फ़ोट करणार आहोत हे देखील विसरला तो. गाडी माझ्याकडे देऊन स्वप्न कंटीन्यू करत तो ...