माझीही अशाच प्रकारची पण मूळ प्रस्तावापेक्षा थोडी वेगळी अडचण आहे. पुणे विद्यापीठातून एम. बी. ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमाच्या अखेरीस संशोधन प्रकल्प सादर करायचा असतो. आमच्या महाविद्यालयाने एम. बी. ए. च्या या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी संशोधन प्रकल्प-अहवालाच्या ( रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट ) हार्ड कॉपीसोबत सॉफ्ट कॉपीही देण्याची सूचना केली होती. मात्र या वर्षीच्या  विद्यार्थ्यांनी त्याच सॉफ्ट कॉपीची नक्कल आपल्या संशोधन प्रकल्पात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या सीडीज विद्यार्थ्यांना देण्यापूर्वी त्याची प्रिंट काढता येणार नाही किंवा प्रत (कॉपी) करता येणार नाही यासाठी काही वेगळी सोय करावी लागणार आहे. हे अहवाल वर्ड, एक्सेल किंवा पी.डी.एफ़. फाईलमध्ये असतात. अशा प्रकारची प्रिंट किंवा कॉपी प्रतिबंधक सोय त्या सीडीज मध्ये करता येते का ? असेल तर कशी करायची असते याविषयीची माहिती हवी आहे.