आमच्या अंगणात बकुळीच्या फुलांचे झाड होते. त्याला छानपैकी टपोरी बकुळीची फुले यायची व पहाटे अंगणभर त्याचा सडा पडलेला असायचा व सगळीकडे त्याचा सुवास दरवळत असे, लवकर उठून कोण जास्तीत जास्त फुले गोळा करतयं ह्याची आमच्या मैत्रीणीत चुरस लागायची.