काल मधुशालेत बसलो पंडितासोबत जरा
लागली परमेश्वराची; बाटली आहे तृषा
 - ह्याचा मला अभिप्रेत असलेला शब्दार्थ असा आहेः मला सर्वसाधारण माणसाला असणाऱ्या तृषा आहेत, त्यातील एक मद्याची. पण काल एका पंडितासोबत पीत बसण्याची चूक केली, व त्याच्या नादी लागून मला परमेश्वरप्राप्तीची तहान लागली. माझी तृषा आपला धर्म सोडूण वागू लागली, अध्यात्माच्या नादी लागली, अर्थात ती बाटली (शेरात हा शब्द क्रियापद म्हणून आला आहे हे अधिक स्पष्ट व्हायला हवे होते असे आता वाटते). ध्वन्यार्थ : मधुशालेत बसणारे सारेच निव्वळ मद्यपी नसतात, आणि असल्यास तेही बदलू शकतात. ईशचिंतन स्थलातीत असते.