पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

ब्राह्मण, ब्राह्मण्य किंवा ब्राह्मणवाद यावर टीका करण्याची सध्या एक फॅशन झाली आहे. ब्राह्मणांवर टीका केली म्हणजे आपले पुरोगामीत्व सिद्ध होते, असे काही मंडळींना वाटते. यातूनच पूर्वीच्या ब्राह्मण इतिहासकारांचे संशोधन कसे चुकीचे आहे, हे सांगण्याची सध्या अहमहमिका लागली आहे. ब्राह्णण इतिहासकारांनी केलेले संशोधन आणि त्यांचे पांडित्य केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून नाकारण्यात येत आहे. ब्राह्मण इतिहासकारांचे संशोधन जर नव्या पुराव्याच्या आधारे चुकीचे निघाले, तर तसे म्हणायला किंवा ते स्वीकारायला काही हरकत नाही, पण त्यासाठी भक्कम पुरावा आणि अभ्यास हवा. ...
पुढे वाचा. : बहुजनांचा सांस्कृतिक दहशतवाद