आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
भयपटांच्या चाहत्यांची जर दोन प्रकारात विभागणी करायची, तर ब्लेअर विच प्रोजेक्ट आवडणारे आणि ब्लेअर विच प्रोजेक्ट न आवडणारे अशी करावी लागेल. आपला चित्रपट हा खरं तर माहितीपटासाठी केलेलं खरंखुरं फूटेज असल्याची बतावणी करणारा, स्पेशल इफेक्ट्सना मुळातच काढून टाकून वातावरण निर्मितीवर भर देणारा, आणि बजेटच्या मर्यादांना सकारात्मक पद्धतीने वापरणारा ब्लेअर विच हा काहींना त्याच्या सूचकतेमधून खूपच घाबरवणारा वाटला होता, तर इतरांना ही केवळ एक पळवाट वाटली होती. मी स्वतः हा चित्रपट आवडणा-यांच्या वर्गात बसत असलो तरी तो न आवडण्याची कारणे मी समजू शकतो. उत्तम ...