भगवतींसारख्या अनेक क्रांतिकारकांमुळेच स्वातंत्र्यलढ्याला धार चढली होती. त्या सर्वांना माझे अभिवादन.
एक शंका मनात येते ती अशी की, मग तेच काम दुसऱ्या एखाद्या सहकाऱ्याने का नाही घेतले? एक सहकारी पडला म्हणून सगळा सुटकेचा डाव मोडणे देशाला फारच घातक ठरलेले दिसते.
तेंव्हा फक्त एकच बाँब बनवला नव्हता हे निश्चित, कारण एकच बनवला आणि त्याची चाचणी घेतली तर प्रत्यक्ष कारवाईच्या वेळेस काय वापरणार? त्यामुळे जादाचे बाँब तर निश्चित होते. मग माघार घ्यायला मनुष्यबळ कमी पडले हे कारण असावे का?