प्राजक्ता२ यांच्याशी सहमत.

बाकी वर्तमानपत्रांचे आणि वाहिन्यांचे पीक आले असल्यामुळे, आता ताबडतोब बातम्या द्याव्या लागतात. त्यामुळे ते "बिच्चारे" (? ) चुका करतात. किंबहुना, जर एका वाक्यात ५-७ इंग्रजी शब्द आले नाही तर ते वाक्य संपादकांना चूक वाटू लागतं. कारण ते वाक्य "त्यांच्या" मालकाला (बहुदा दिल्लीतल्या) कळायला हवं ना.

इंग्रजीचं व्याकरण हे केवळ इंग्रजांनीच शिकायचं असं या पत्रकारांना वाटतं. मराठीला "ग्रामर" नसतच, त्यामुळे प्रश्नच नाही. बाकी दर्जा म्हणजे पैसा हेच समीकरण असल्याने, तो सांभाळला जातोय. कसे ?

तसा दर्जा ठेवून वाहिनी चालवायची असेल तर मनोगतींनी यावर विचार करायला काय हरकत आहे ? नाही म्हणजे विचार करायला पैसा लागत नाही, मराठी माणूस वाहिनी/ वर्तमानपत्र (व्यवसाय) सुरू करणार नाही हे माहिती आहेच ना.... ?