ग. दि. माडगूळकर यांचे

"रम्य ही स्वर्गाहून लंका" हे गाणे त्याच लंकेचे उत्तम वर्णन करते.

गायक: पं. भीमसेन जोशी, संगीतः वसंत देसाई, चित्रपट: स्वयंवर झाले सीतेचे

रम्य ही स्वर्गाहून लंका
हिच्या कीर्तिच्या सागर लहरी नादविती डंका

सुवर्ण कमलापरी ही नगरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
त्या कमलावर चंद्र निजकरे करितो अभिषेका

लक्ष्मी-लंका दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितुनी
या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का?

हे गाणे रम्य ही स्वर्गाहून लंका

या दुव्यावर ऐकताही येईल.