चोरतो आणि जिंदगी हे शेर आवडले!
माळ आणि फुले वरचा दीपिकाताईंचा प्रतिसादाने विचारात पडलो. मी नेमका याच्या उलटा अर्थ घेतला होता. माळ ओढण्यात मला भोंदूपणा दिसला नव्हता... माझ्या मनात असे आले -
माळ ओढणे ही २-४ सेकंदात उरकता येणारी गोष्ट नाही. त्यासाठी चिकाटी लागते. एकाग्रता लागते. नियमीतपणा लागतो. बांधीलकी (कमिटमेंट? ) लागते. फुले वाहायला या सगळ्याची गरज नाही. "माळ ओढणे" मला "फुले वाहणे" पेक्षा जास्त गंभीर, विचारपूर्वक केलेली कृती वाटते.
माझी पत्नी नियमीत जप करते. म्हणून कदाचित माझी अशी भूमिका तयार झाली आहे. पण दीपिकाताई म्हणताहेत तसाही अर्थ लावता येऊ शकतो!