पुलस्तिजी,
माळ ओढणे ही २-४ सेकंदात उरकता येणारी गोष्ट नाही. त्यासाठी चिकाटी लागते. एकाग्रता लागते. नियमीतपणा लागतो. बांधीलकी (कमिटमेंट? ) लागते. फुले वाहायला या सगळ्याची गरज नाही. "माळ ओढणे" मला "फुले वाहणे" पेक्षा जास्त गंभीर, विचारपूर्वक केलेली कृती वाटते.
--- बरोबर! या शेरामागे हाच  विचार आहे. त्यासाठी चिकाटी लागते. एकाग्रता लागते. नियमीतपणा लागतो व नेमके हेच करण्याइतका संयम "माझ्या"त नाही. त्यामुळे फुले वाहण्यासारखी सोपी कृती "जमेल तेंव्हा" करतो. यात 'माळ ओढणे' ह्या कृतीचा कुठलाही उपरोध/विरोध नाही.

दीपिकाताई,
तुम्ही म्हणता तसाही अर्थ लावता येऊ शकतो! पण माळ ओढणे यात दांभिकता आहे असे मी बिल्कुल मानत नाही.
हा शेर अधिक स्पष्ट करण्यासाठी विचार करीत आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
जयन्ता५२