तांबडं फुटतंय... येथे हे वाचायला मिळाले:
पहाटं तिनच्या सुमारास कोंबड्यानं पहिली बांग दिल्याबरोबर झुंबराबाईनं चुलीत काडक्या सरकवायला सुरवात केली. रात्री राखेत गाडलेल्या विस्तवाला फुकणीनं फुकर मारुन चुल पेटविण्याची तिची नेहमीचीच धडपड सुरु झाली. दगडूनं एव्हाना शेणकूर आवरुन बैलं जोगवायला सुरवात केली होती. फुंकणीचा आवाज ऐकून भाऊ जागा झाला आणि थेट चुलीपुढं जावून बसला. ""भावड्या उठ, इथं डुलक्या नको घेऊ. न्हाई तर बाजाराला उशीर व्हईल. उठ आन् गोधाड्यांच्या घड्या कर पहिल्या.'' आईनं बाजाराचं नाव काढताच भाऊचं कान टवकारलं. काही न बोलता पालथ्या मुठीनं डोळं चोळत तो आंथरुण-पांघरुणांच्या घड्या ...