झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:
कॉलेजमध्ये एक उत्तररामचरितातला वेचा (हा खास अर्जुनवाडकर बाईंचा शब्द) अभ्यासाला होता ... त्यात वासंती वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वाढणाऱ्या लवकुशांचं कौतुक कुणाला तरी सांगत असते - या दोन तेजस्वी कुमारांना इतर अनेक विद्या, कला आणि शस्त्रास्त्रांबरोबरच सरहस्य - म्हणजे मंत्रासहित - जृंभकास्त्रही अवगत आहे. या अस्त्राच्या प्रयोगाने शत्रूला एकापाठोपाठ एक जांभया यायला लागतात, आणि शेवटी शत्रू हतबल होतो. उत्तररामचरितातलं तेंव्हा शिकलेलं बाकी फारसं काही आठवलं नाही तरी हे जृंभकास्त्र मात्र पक्कं डोक्यात बसलं. ...