पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला असे म्हणण्याचे दिवस असताना मुंबईकर आणि राज्यातील लोकांना घनघनमाला नभी दाटल्या कोसळती धारा असे म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात पाऊस नाही आणि थंडीच्या दिवसात चक्क पाऊस, असे बदललेले ऋतूचक्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खरे तर लहरीपणाने वागणे हा माणसाचा स्वभाव आहे. निसर्ग कधीही लहरीप्रमाणे वागत नाही. निसर्गाची प्रत्येक गोष्ट नियमानुसारच सुरु असते. मग गेल्या काही वर्षात असे काय घडले की निसर्गालाही आपले नियम गुंडाळून ठेवावे लागले. त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार ...
पुढे वाचा. : अजून वेळ गेलेली नाही...