प्रथम पुलस्तींच्याच मनातील विचार मलाही जाणवला होता. दीपिकाताईंना माळ ओढण्यात भोंदूपणा का वाटला असावा हे मात्र लक्षात आले नाही. पण ही चर्चा पाहून एक वेगळाच अर्थ जाणवला.
यात ओढणे व वाहणे या क्रियांमधील फरकाकडे पाहावेत अशी विनंती!
ईश्वराला प्रयत्नपुर्वक आपल्याकडे ओढणे काही शक्य होत नाही. कारण जीवनात अनेक वेळा अशा काही गोष्टी कराव्या लागतात की त्यामुळे जवळ आलेला ईश्वर पुन्हा मागे जातो.
मात्र, ईश्वराचे महत्त्व तर आहे. मग आता काय करायचे? आपल्यासाठी, कुटुंबियांसाठी काही गोष्टी (ज्या ईश्वरास मान्य नसाव्यात ) त्या तर कराव्याच लागणार अन ईश्वरही हवा आहेच!
तेव्हा आपली भक्ती म्हणून थोडीशी फुले जमेल तेव्हा वाहून 'टाकावीत' !
या शेरात माझ्यामते रदीफ अत्यंत घट्ट नात्याने आली आहे.
मुळातच या गजलेची रदीफ मला फार आवडली व त्या रदीफमध्ये एक 'एकाचवेळी बेदरकार पण तरी मनात जाणीव असलेली' अशी वृत्ती प्रदर्शित होते असे वाटते. म्हणजे 'करत नाही पण करायला हवे हे जाणवत राहते' असे काहीतरी!
जयंतरावांकडून बरेच दिवसांनी एक उत्तम गजल आली. अभिनंदन! जंदगी सुसाट धावे - हा शेर अप्रतिम आहे.
मात्र, मतल्यातील दोन ओळींचा संबंध लक्षात आला नाही किंवा फारसा नसावाच असे वाटले.
-बेफिकीर!