एकूण माणसाचे शारीरिक वजन हा मोठा बोजड विषय आहे.
आजचीच गोष्ट - संध्याकाळी एक मैत्रीण जवळपास दीड वर्षांने भेटली. मध्यंतरी युरोपात वगैरे जाऊन आली, असं काही सांगत होती. मी ऐकत होतो. एकदम सटकली, माझं वजन इतकं कमी झालंय आणि तुम्ही काही बोलत नाही? बापरे, माझं तर इकडं लक्षच नव्हतं. मग मी शांतपणे ऐकत राहिलो. ९५ किलो वगैरे आकडा आला, आत्ता किती आहे वगैरे माहिती दिली गेली. मी म्हटलं, "माझं वजन किती? त्या तुलनेत तू किती कमी केलंस याला मी काय महत्त्व द्यायचं?" मग हसली. शेवटी म्हणालो, "ही सगळी मोठं होण्याची लक्षणं. वजनाचा मोठा आकडा, मग तो कमी करण्याचे प्रयत्न आणि शेवटी पुन्हा नव्याने आलेला आकडा - मोठं होणं सहज शक्य आहे, याची खात्री त्या नंतरच्याच आकड्यातून पुन्हा माणसाला मिळत असते..."
मागं एकीला वजन कमी कर म्हटलं तर तीही सटकली होती - तुला काय करायच्या या उपाध्या?
लेखात हाही पेच चांगला टिपला आहे वेगळ्या रुपकातून.
सुरवात साडी आणि ब्लाऊजपासूनच का झाली?