समयोचित आणि यथातथ्य प्रकटन! आवडले.
वजनाचे ओझे काय काय व्याधी जडवते हे खरेच पाहण्यासारखे आहे.
१. वाढत्या वजनाने गुडघ्यांवर अवाजवी भार पडून सांधेदुखी उद्भवते.
२. वाढत्या वजनाची वाहतूक करण्यास शरीरास जास्त ऊर्जा लागते, अन्न लागते आणि मग वजन आणखीनच वाढते.
३. वाढते वजन मधुमेहाप्रत घेऊन जाते.
४. वाढते वजन हृदयावर ताण वाढवून त्याला अशक्त करते.
५. वाढत्या वजनाने शारीरिक हालचाली मंदावतात व मनास हुरूप राहत नाही.
६. खाण्याच्या हौसेपायी मनुष्य आयुष्यच भक्षण करतो.
मात्र सुवर्णमयी म्हणतात त्याप्रमाणे हल्ली या आजाराचे हमखास निदान, उपचार आणि प्रतिबंध करणे शक्य झालेले आहे. शंभर टक्के यशाची हमी देता येते. फक्त योग्य सल्ला आणि कर्मठ अंमलबजावणीची गरज असते.
हे आपल्या स्वतःस आणि आपल्या सुहृदांस पटवून निरामय, ओझेविरहित जीवन जगण्यास त्यांना प्रोत्साहित करण्यातच आपले भवितव्य उज्ज्वल होण्याची संधी सामावलेली आहे.
म्हणून, सुवर्णमयी, आपल्या या कुशल कानटोचणीचे मी कौतुक करतो.
सर्व मनोगतींनी या सल्ल्याचे मोल लक्षात घेऊन आरोग्याचा मार्ग सत्त्वर अवलंबावा हीच प्रार्थना!