वरील सर्वंचे प्रतिसादांबद्दल आभार.(महेश यांना 'दुसरा सामना' असे म्हणायचे असावे. )
कॉलेजच्या काळात महापूर, झुलता पूल वगैरे आळेकरांच्या एकांकांचे प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आम्ही मित्र सहभगी झालो होतो.
तशा एकांकिका लिहिण्याचा प्रयत्न मी केला होता. त्यामुळे त्यांची नाटके जवळची वाटतात.
नव्या पिढीत मकरंद साठे, अतुल पेठे अशीच वेगळी नाटके लिहीत/करत आहेत. त्यांचेही प्रयत्न स्तुत्यच आहेत.
अर्थात असे असले तरी मुख्य प्रवाहातली नाटकेही मराठी रंगभूमीला सशक्त बनवत आहेतच. किंबहुना मराठी रंगमंचाची विविधता आणि प्रत्येक प्रकारातली गुणवत्ता हेच सामर्थ्य आहे.