जीवनशैली यामुळे लठ्ठपणाला निमंत्रण मिळते. अगदीं खरें. पण नवीन पिढीचें चित्र आशादायी आहे. मद्यपानाचें प्रमाण खूपच कमी झालें आहे. धूम्रपान जवळजवळ नाहींच. घरापासून, आईबाबांपासून दूर, विविध मोहाचे क्षण खुणावत असतांना देखील बहुतेक तरूण तरुणी आपल्या करिअरला प्रथम प्राधान्य देतात. अर्थात रेव्ह पार्टीसारखे वणिक्बाळांचे, अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या पुत्र/कन्या रत्नांचे अपवाद आहेतच.
मधुमेहाचे बरेच रुग्ण हे चुकीच्या जीवनशैलीचे बळी असतात.
छान लेख.
सुनील पाटसकरांच्या
साठीच्या व्यक्तीची कलप लावून ते केस काळे आहेत , आपण तरुण
आहोत हे दाखवण्याची धडपडही वाढते आहे.
या मताशीं मीं सहमत नाहीं. प्रसाधन हें केवळ भिन्नलिंगी व्यक्तीवर प्रभाव टाकण्यासाठीं नसतें. तो प्रसन्न जीवनशैलीचा एक अत्यावश्यक भाग आहे. नीटनेटके दिसण्यासाठीं सर्व प्रकारचीं प्रसाधनें जरूर वापरावींत. माझ्या कार्यालयांतील तरूण मुलें मुली दोन्ही लोक माझ्या केसांचा रंग उडाला कीं लगेच आपुलकीनें सांगत कीं उद्यां केंस रंगवून या नाहींतर तुम्हांला घरीं पाठवूं.
जेव्हां जनसंपर्क साधायचा असतो, खासकरून सरकारी अधिकाऱ्यांशीं तेव्हां आपल्या प्रथमदर्शनानेंच अर्धें काम होतें असा माझा अनुभव आहे. एक रुबाबदार माणूस संपूर्ण कार्यालयाचा चेहरामोहरा बदलून टाकतो आणि एक गबाळी व्यक्ती त्याची पार वाट लावूं शकते. विक्री आणि पणन - मार्केटिंग च्या लोकांना तर बावळटासारखे गेले तर अजिबात व्यवसाय मिळणार नाहीं.
सुधीर कांदळकर.