prajkta येथे हे वाचायला मिळाले:
खूप दिवस झाले तुला पत्र लिहिण्याचा विचार डोक्यात घोळत होता; पण कारणच सापडत नव्हते. त्याला कारण म्हणजे एक तर तू अपयशी ठरलास की प्रसारमाध्यमं (विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स) तुझ्यावर अक्षरशः तुटून पडतात. दिवसभर त्यांचं चॅनेल ढणढणत राहतं आणि पाहणारेही मग हळूहळू सचिन संपलाय, या हाकाटीच्या बाजूने झुकू लागतात. हा गेल्या काही वर्षांमधील अगदी परिपाठ झालेला आहे. तुझ्या निवृत्तीसाठी तर अनेक जण देव पाण्यात ठेवल्याप्रमाणे वागत, लिहीत, बोलत असतात. जेव्हा जेव्हा तुझ्यावर टीकेचे फुटेज सुरू व्हायचे तेव्हा तेव्हा त्या चॅनेलवाल्यांचे तोंड फोडावे असे वाटायचे. ...