सर्वसाक्षी ,
दुर्मिळ असा इतिहास आपण आज समोर आणलात त्याबद्दल धन्यवाद ! जे यशस्वी झालेत त्यांची नावे तर आपल्याला वाचायला मिळतातच व आपण त्यांना सिकंदर समजतो. पण स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात कित्येक मोहरे फक्त प्रयत्न करण्यासाठी खर्ची झाले असतील. त्यांना न मिळालेली प्रसिद्धी हा त्यांच्यावर व त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर अन्याय आहे. आपणांकडे अजून असे मोहरे असतील तर कृपया त्यांना प्रकाशात आणण्याचे मनावर घ्या आम्हीही आमच्या ज्ञानात वृद्धी करू.
माधव कुळकर्णी.