गझलकार येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या १५ जुलै १९८२ रोजी श्री सुधाकर कदम यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ‘अशी गावी मराठी गझल’ हा आपला मराठी गझल गायनाचा कार्यक्रम सादर केला़. मी स्वतः या कार्यक्रमात निवेदक म्हणून हजर होतो़. केसरीच्या २५ जुलैच्या अंकात श्री सुधाकर कदम यांच्या मराठी गझलगायनाच्या कार्यक्रमाविषयी गझल गायन की भावगीत गायन? असे शीर्षक असलेला ‘रसिकमित्र’ या टोपणनावाने एक लेख प्रसिद्ध झालेला आहे़. या लेखात व्यक्त झालेली मते मराठी गझल व मराठी गझल गायनाविषयी सामान्य जनतेत गैरसमज पसरवणारी आहेत, असे मला वाटते़.स्पष्टपणा नाही ...