मा. भोमेकाका,

 

आपली शंका रास्त आहे. पणः युद्धात एक सैनिक पडला तर लगेच दुसरा त्याची जागा घेतो आणि लढा चालू ठेवतो ते इथे तसे शक्य नव्हते. मुळात क्रांतिकारकांच्या सर्व हालचाली या अतिशय सावध व मर्यादित होत्या कारण त्या सर्वांवर अटकनामा बजावण्यात आला होता, सर्वांच्या मागावर सरकार जागती पाळत ठेवून होते. अशा परिस्थितीत जेव्हा शहरात बॉम्ब्स्फ़ोट होउन एक व्यक्ति मृत्युमुखी पडते आणि ती व्यक्ति ही एक अती महत्त्वाची क्रांतीकारक असते, तेव्हा ही घटना नाही म्हंटले तरी पसरणारच. अशा कटाचा काही सुगावा लागला तर ठरलेला हला तर फ़सणारच पण उलट सावध झालेल्या आणि चाळवलेल्या पोलिसांमुळे सुटकेच्या प्रयत्नात भूमिगतांपैकी काही वीर पोलीसांच्या हाती लागण्याचा धोका होता. बहुधा या सर्व परिस्थितीमुळे नाइलाजाने भगतसिंहाच्या सुटकेचा प्रयत्न त्याक्षणी तरी सोडून द्यावा लागला असावा. अन्यथा बॉम्ब्स्फ़ोट करण्यास वैशंपायन इत्यादी उत्सुक असलेले तरुण सुटकेच्या प्रयत्नासाठी तयार नक्कीच झाले असते. एक अतिरिक्त बॉम्बही उपलब्ध होता.