डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
ही मिडीया खरं सांगायचं तर डोक्यात गेली आहे माझ्या. अक्कल नसल्यासारखं ‘बायस’ होऊन बातम्या देणं चालु आहे असं मला तरी वाटतं.
अबु आझमी बद्दल जे काही घडलं त्यावरुन त्यांनी ‘राज ठाकरेचे गुंड’ हा जो उल्लेख केला तो मला तरी फार खटकला. मारामाऱ्या काय फक्त राज ठाकरेच करतो का? गेल्या वर्षी कलेक्टर कचेरीवर जी मोडतोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली त्याची भरपाई म्हणुन राज ठाकरेने ५२ हजार रुपये जमा केले ही बातमी का मग झाकोळली गेली? मराठी आरक्षणाला लोकांचा विरोध आहे. का? का तर म्हणे देश्याच्या फाळण्या होतील. मग