संदर्भित जाहिरात कंपनीची वर्तणूक काहीशी घमेंडखोर वाटते. साधारणपणे प्रतिष्ठित कंपन्यांचा नकारही सौजन्यपूर्ण असतो. बघायला घेतलेली गोष्ट आवर्जून परत करणे किंवा देऊ शकत नसल्यास दिलगिरी व्यक्त करणे हा त्या सौजन्याचाच भाग असतो. "अंक परत बिरत मिळत नसतात ........ " अशासारखी भाषा वापरून स्वतःच्या मोठेपणाचा टेंभा खरोखर मोठी असणारी कंपनी कधीच मिरवणार नाही.