इतिहासाच्या मर्यादा सुध्दा "जर आणि तर" मध्येच सामावल्या जातात. महाभारतामध्ये अभिमन्युचे, मराठ्याच्या इतिहासामध्ये संताजीचे आणि भारतीय स्वातंत्र्य युध्दात भगतसिंग आदी यांचे यश, किर्ती आणि पराक्रम सामावलेला आहे.
समजा भगतसिंग आणि इतर क्रांतीकारकारंचा लढा यशस्वी झाला असता तर नेमके काय झाले असते असे प्रश्नचिन्ह माझ्या मनात नेहमीच तरळत असते.
सशस्त्र लढ्यामधे अपेक्षित असणारे वलय या लोकांकडे होते यात शंकाच नाही. पण हा लढा सामान्याना आपला वाटला असता काय? त्यांचे सामाजिक, राजकिय आणि आर्थिक प्रश्न सुटु शकले असते काय यावर मला शंकाच वाटते.
हा प्रश्न बराचसा भावनिक असल्यामुळे यावर प्रामाणिक चिंतन आणि मनन आपण करणार आहोत काय हा वेगळा प्रश्नच आहे.
व्यक्तिगत बैठकीचे मत मी सार्वजनीक ठिकाणी मांडत आहे, पण कोणीतरी हे सांगायलाच हवे असे मला वाटते म्हणून मांडत आहे.
द्वारकानाथ