माहिती दिलीत. तुम्हाला आलेले अनुभव वाचून (खास करून ब्रेकबाबत!) निश्चितच सतर्क राहावे लागेल.

पुण्यामध्ये (शक्यतो कोथरुडमध्ये) मारुतीचा चांगला मेकॅनिक कोण आहे? कारण मध्यंतरी मी खर्चात पडता पडता वाचलो. मी गाडी शहराच्या मध्यवर्ती भागात घेऊन गेलो होतो. डेक्कन, ज. म. रस्ता येथे. गाडी चालवताना मला जाणवले की नेहमीपेक्षा जास्त ओढ बसते आहे तसेच इंजिन नेहमीपेक्षा जास्त गरम झाले आहे. म्हणून मी घराजवळच असलेल्या मेकॅनिककडे गेलो. त्याने उगीच बघितल्यासारखे केले आणि सांगितले ब्रेक खराब झाले आहेत. बदलावे लागतील. मी खर्चाचा अंदाज विचारल्यावर १३०० होतील असे म्हणाला. मला ते योग्य वाटले नाही म्हणून मी आता काम आहे, नंतर येतो असे म्हणालो. (त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी दिसत होती.) नंतर एक मित्राच्या सल्ल्याने त्याच्या मेकॅनिककडे गेल्यावर त्याने गाडी बघितली व सांगितले की माझ्या गाडीचा हँडब्रेक थोडा अडकत होता. त्यामुळे इंजिन थोडे गरम झाले. (त्याच्याशी बोलताना नंतर मला कळले की गावात गाडी चालवताना सारखे गियर बदलणे व ब्रेक दाबणे ह्यामुळे इंजिन थोडे गरम होऊ शकते. कारण ह्याआधी मी गाडी फक्त हायवे वर ते सुद्धा ५०-६० कि. मी. चालवली होती. तसेच गाडी फार काळ वापराविना राहिल्यास हँडब्रेक केबल अडकू शकते.) सगळे मिळून कामाचे २०० रु. बिल झाले.