मोगरा ह्यांच्या मताशी सहमत!! मुख्य म्हणजे अशा अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रीने नंतर कोणताही न्यूनगंड मनात बाळगू नये. (अर्थात सांगणे सोपे असले तरी करणे अवघड आहे) आपल्यावर बलात्कार होणे हा त्या स्त्रीचा दोष मुळीच नसतो. (इथे प्रमाणाबाहेर अंगप्रदर्शन करणाऱ्या स्त्रियांना वगळण्यात आले आहे). त्यामुळे तिने खचून न जाता झालेल्या गोष्टीकडे एक अपघात म्हणून पाहावे व पुढचे जीवन आनंदाने जगावे. त्या स्त्रीच्या संबंधितांनी (नवरा, आई, वडील इ. ) देखील तिला मानसिक आधार देऊन तिला सावरणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच अश्या स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा द्ष्टीकोन बदलणे गरजेचे आहे.