ओमानच्या ह्या कंपनीच्या एका विभागात एक मराठी माणूस गट प्रमुख होता, त्यामुळे त्याची एक पातळी ( लेव्हल ) होती. मी एक तंत्रज्ञ म्हणजे कामगार पातळीचा होतो, एका मराठी कार्यक्रमाला जाताना मला बरोबर नेशील का असा प्रश्न मी त्याला केला असताना कळले की, त्याला त्याची पातळी सांभाळावी लागते, त्यामुळे तो मला " एन्टरटेन " करू शकणार नाही. ही व्यावसायिक जातपात मला नवीन होती, हे असले अनुभव पचवणे मी शिकलो.

अरेरे. मी असे मराठी मंडळींबद्दल ऐकले होते पण विश्वास नव्हता. तुमचा अनुभव भयंकर आहे.

तुमची गोष्ट चांगली चालू आहे ३७ भाग वाचून संपले तोच ३८ वा भाग आला.

वेगळे वेगळे अनुभव वाचायला मिळतात.