मानसिकता यावर मानसशास्त्रीय संशोधन होणें जरूर आहे. एकदां मला रात्रीं उशिरां रेलवेच्या डब्यांत एक बसमधली सहप्रवासिनी तरुणी भेटली. 'बोरिवली' घटनेच्या नंतर एकदोन आठवड्यानंतरचा काळ. दिसायला सर्वसाधारण. नेहमीं सभ्य कपड्यांत वावरणारी. तिनें मला कांदिवलीपर्यंत सोबत करायची विनंती केली. त्यांच्या ४१५ क्रमांकाच्या बसच्या रांगेतला कंपू माझ्या तोंडओळखीचा होता. माझ्या घरीं मालाड कांदिवली दोन्हीकडून जातां येतें हें तिला ठाऊक होतें. मीं तिला विचारलें कीं आज तुझ्याबरोबर तुमच्या कंपूतला एखादा मुलगा कां नाहीं? ती म्हणाली कीं एक होता पण त्याला टाळूनच आले. अगदीं 'ममाज बॉय' असलेलीं मुलें देखील एकट्या मुलीशी सभ्यपणें वागतील याची खात्री नाहीं.
तिचें हें मत मला धक्कादायक वाटलें.
सुधीर कांदळकर