द्वारकानाथजी,

 "भारतीय स्वातंत्र्य युध्दात भगतसिंग आदी यांचे यश, किर्ती आणि पराक्रम सामावलेला आहे.समजा भगतसिंग आणि इतर क्रांतीकारकारंचा लढा यशस्वी झाला असता तर नेमके काय झाले असते असे प्रश्नचिन्ह माझ्या मनात नेहमीच तरळत असते"

ह्या जर साठी  फार मोठी किंमत द्यावी लागली असती -"आम्ही" जे हिंदुस्तानचे स्वातंत्र्य म्हणजे फक्त आमचीच जबाबदारी वा जहागीरदारी आहे ह्या समजात वावरत होतो त्या समजाला जोरदार धक्का बसला असता व आमची सद्दी साफ संपुष्टांत आली असती. त्यामुळे आमच्या सर्व रोजगार योजना ज्या आजही आम्ही अंमलात आणत आहोत त्या संपुष्टात आल्या असत्या व विदेशी वस्तूंचे आमचे वेड खाडकन डोक्यातून उतरले असते व बरेच असेच काही मुद्दे आहेत ह्या तुमच्या "जर" वर....! एक सर्व्हर कमी पडेल !!!

माधव कुळकर्णी.