त्याहीपेक्षा अधिक जोमाने माझ्या सुपीक डोक्यातून अनेक हरहुन्नरी विचारांचे पीक निघत असते. मग त्यासाठी एखादीच ठिणगी पुरेशीअसते.... भुस्सदिशी विचारांचा जाळ उमटतो आणि त्याचे पर्यवसान अनोख्या 'कला(? )कृती'मध्ये होते!!

काही सांगूच नकाहो तुमची भाषाच इतकी कसदार आहे की काय सांगावे. ठसाठस भरलेल्या दारूच्या कोठारातून एकेक बाण, भुईनळे चंद्रज्योतींची आतषबाजी व्हावी तस्या झंजावातानी तुम्ही लिहिलेल आहे. वाचायला सुर्वात केल्यावर थांबणे शक्य्च नाही.

उदा.

बऱ्याच वस्तू कोणाकोणाच्या हातांत कोंबल्या आहेत
विणलेल्या खांबांमधूनलपंडाव
पोपटाचा डोळा दिसत होता तशी मला फक्त पोपटी लोकर दिसतहोती

सर्व आवडले. लेखही आवडला आणि आपली शैलीही.

असेच लिहीत राहावे.

-श्री‌. सर. (दोन्ही)