पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
सर्वसामान्य माणूस हादेखील वर्दीविना पोलिस आहे. त्यांचाही पोलिसांच्या कामात सहभाग हवा असतो, असे पोलिस दलातर्फे नेहमी सांगितले जाते. मात्र, जेव्हा पोलिस सामान्य माणसाच्या भूमिकेत असतो (म्हणजे रजेवर किंवा काम संपवून घरी जाताना), तेव्हा त्यांचे वर्तन कसे असते, हे सर्वांना माहिती आहे. आपली ओळख लपविण्यासाठी अंगावरील खाकी वर्दीही बहुतांश पोलिस झाकून घेतात. रस्त्यात काही प्रसंग घडल्यास आपण पोलिस असल्याचे कळाल्यावर लोक आपल्यामागे लागतील. त्यामुळे ही नस्ती झंजट नको, म्हणून खाकी वर्दीवर साधा शर्ट चढवून फिरणारे अनेक पोलिस ...