ऊर्मी येथे हे वाचायला मिळाले:
आज सोमवार, आठवडा सुरु, कामाचा दिवस म्हणुन काल रात्री सगळं आटोपुन जरा लवकरच झोपलो. त्यावेळी बाहेर पाऊस, साचलेलं पाणि आणि चिखलाव्यतिरीक्त बाकी सगळं आलबेल होतं :). मध्यरात्री मधेच जाग आली. पडल्या पडल्या खिडकितुन बाहेर बघितलं तर आकाश एकदम लखलखीत दिसत होतं. पण झोपेचा अंमल म्हणा किंवा अजुन काही मी तशिच परत झोपले. सकाळी सहाला नेहेमीप्रमाणे उठले आणि सवयीप्रमाणे स्वयंपाकघरात जाऊन पोळ्यांसाठी तवा बर्नर वर ठेवला तेव्हा सहजच नजर खिडकीबाहेर गेली. आं हे काय? बाहेर इंच अन इंच जागा बर्फाने व्यापली होती. काल रात्री इथे खुपच बर्फ पडला. आता मला काल रात्री ...