आबू आझमींच्या बाबतीत घडलेला प्रकार हा देशांतील पहिलाच प्रकार नाही. काही वर्षांपूर्वी तामीळनाडू विधानसभेत जयललिता विरोधी पक्षनेत्या असतांना त्यांचा पदर ओढण्याचा प्रकार झाला होता. त्यावर टाइम्स ऑफ इंडियात व्यंगचित्रही आले होते. त्यात जयललितांच्या तोंडी  "दे डोण्ट नो व्हेन टु से कट" असे शब्द टाइम्स ने टाकले होते. तसेच देवेगौडा पंतप्रधान असतांना फूलनदेवीने भर लोकसभेत "इस देवेगौडाके ..... पे लात मारके उसको निकाल दो" यातील गाळलेला शब्दही स्पष्टपणे म्हंटल्याचे दूरदर्शनवरील प्रक्षेपणात देशभर ऐकू गेले.