पत्रकार व छायाचित्रकार ह्यांना असे प्रश्न व छाया चित्र काढण्याचे हजारो रुपये मिळतात, त्यांना मोठाल्या कंपन्या पोसतात. सचिनला प्रसिद्धी माध्यम नवीन नाही.  तो सहज सांगू शकला असता -" मी खेळाडू आहे खेळा विषयी उत्तरे देईन, मी एक भारतीय आहे. " संपले पुढचा एकाही शब्दाची जरुर नव्हती.  वैशाली म्हाडेला सारेगमपच्या मंचावर अशाच प्रकारचा प्रश्न केला असता तिने किती सफाईने उत्तर दिले होते - " मै इस मंचपर गाना गानेके लिये आयी हूं, सवाल गानेके बारेमे हो तो जाबाब मिलेगा. " हा मुद्दा लक्षात घेण्या इतका महत्त्वाचा आहे. हाच प्रकार अबू आझमीच्या बाबतीत झाला आणि त्याचा फायदा अपेक्षितांनी घेतला.