आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
हूडविन्कड् चित्रपट सुरू होतो, तो रेड रायडिंग हूड या जगविख्यात परिकथेतील अखेरच्या प्रसंगापासून. रेड रायडिंग हूड आपल्या आजीच्या बगलीत शिरते आणि लगेचच तिच्या लक्षात येतं की आजचा दिवस नेहमीपेक्षा वेगळा आहे. आजी पलंग सोडून पुढे यायला तयार नाही आणि ती दिसतेही थोडी वेगळी. बोलताना तिचं तोंड हलत नाही आणि तिच्या हातांची जागाही केसाळ पंजांनी घेतलेली. लवकरच मुखवटाधारी लांडगा आपण घेतलेलं आजीचं सोंग काढून टाकतो आणि रेडवर झडप घालतो. लगेच कपाटावर धडका बसतात आणि लांडग्याने बांधून ठेवलेली आजी बाहेर येते. चाललेल्या गोंधळात भर घालण्यासाठी खिडकी तोडून आपली ...
पुढे वाचा. : हूडविन्कड -एक हूड प्रयोग