काळजावर वेदनांची चाल आहे
'हासणे' माझी पुराणी ढाल आहे
- छान.
द्या मते,लक्षात ठेवा की निशाणी
"पाच बोटे उमटलेला गाल आहे!"
- वा वा! ही गझल जरा उशिरा प्रकाशित केलीत, जयंतराव. नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या आधी द्यायला हवी होती.
मक्ताही आवडला. मात्र संगीताच्या बाबतीत माझे अज्ञान अगाध असल्यामुळे मक्ता वाचून मला पडलेला एक प्रश्न विचारतो. सम 'सापडते' व सूर 'जुळतो' असे ऐकले होते. समेच्या संदर्भातही 'जुळणे' वापरतात का? नसल्यास 'सापडेना सम सुखाची एकदाही' असेही म्हणता येईल. पुन्हा सांगतो की ही टीका नसून अज्ञानजन्य प्रश्न आहे.