१. सध्यां जीं वांगीं भारतांत पिकतात. पाचंपन्नास जाती असतील त्यांच्या, तीं असतांना मुळांत या विकतच्या वाणाची जरूर आहे कां.
२. जर नसेल तर हें बियाणें कां घ्यावें? केवळ बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपन्या चालाव्या म्हणून? एक मालवणी म्हण आहे. दुभती म्हस इकून    मारको रेडो कोनी आणि कित्याक घेउचो? ती इथें चपखल लागू पडते.
३. एकरीं उत्पादनः हीं बीटी वांगीं एकरीं किती उत्पादन देतात? आणि देशी वांगीं किती उत्पादन देतात?
४. उत्पादनकालः बीटी वांगीं देशी हवामानांत किती दिवसांत तयार होतात आणि देशी वांगीं किती दिवसांत तयार होतात.
५. एकरीं/हेक्टरीं रासायनिक खतांची जरूर व देशी बनावटीची उपलब्धताः बीटी वांग्यांना एकरीं किती रासायनिक खत लागतें आणि देशी वांग्यांना किती? या खताची देशी बनावटीची उपलब्धता काय आहे? अमेरिका तर आपल्या खतांवरची सबसिडी काढून टाका म्हणते आहे म्हणजे एकरी खर्च वाढणारच.
६. जीवशास्त्रीय खतांची बायो फर्टिलायझर्सची एकरीं/हेक्टरीं मात्राः बीटी वांग्याना लागणारीं जीवशास्त्रीय खतें व देशी वाग्यांना
बाजारांत आलीं?

वरील आंकडेवारी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही लेखांत मला आढळली नाहीं. म्हणजे बीटीचा प्रचार हा भोंगळ आणि फसवा आहे.

वरील प्रश्नांचीं उत्तरें समाधानकारक असतील तरच मानवी शरीरावर या बीटी वांग्यांच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करावा. कारण या अभ्यासाला खर्च बराच येतो. संशोधन केल्यास तें भारत सरकारनेंच करावें. हा खर्च बीटी वांग्याच्या वाणाचे उत्पादक उचलणार आहेत कां? नसल्यास भारतानें कां उचलावा. परदेशी अहवालावर विश्वास ठेवूं नयेत कारण ते बनावटच असण्याची शक्यता आहे.

या संशोधनांत एक जरी तोटा आढळला तर बियाणें भारतांत अजिबात आणूं नये.

एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल लेखिकेस धन्यवाद.

सुधीर कांदळकर.