@सुधीर कांदळकर : तुम्ही मांडलेले मुद्दे खूप लोकांच्या मनात डोकावून गेलेत हो! पण अनेकजण 'आपण पडलो सामान्य माणूस, आपण काय करणार' असे म्हणत मान हलवितात, खांदे उडवितात व पुन्हा एक नैराश्ययुक्त सूर बाळगून नित्यकर्मांस लागतात. सुशिक्षित माणसाला रस्त्यावर उतरून आंदोलने करणे जमेल, जमणार नाही कदाचित! परंतु आपल्या लेखणीच्या, बोलण्याच्या जोरावर तो नक्कीच आजूबाजूला जागरूकता निर्माण करू शकतो. त्या निमित्ताने एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणू शकतो. मनोगत सारख्या मराठी संकेतस्थळाने आपल्याला ही संधी दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार! आपल्या लिखाणामुळे मूळ लेखातील मुद्यांमध्ये अजून मोलाची भर पडली आहे. धन्यवाद!
-- अरुंधती कुलकर्णी.
http://iravatik.blogspot.com/