ज्यांची एकही चूक होत नाही त्यांनीच आपले मनोगत व्यक्त करावे असे नाही

परखड यांनी माझ्या चूका दाखवल्या, त्या मी मनाला लावून घेत नाही. पण महत्त्वाचा विषय माझ्यासाठी हा आहे, की दर्जेदार असल्याचा मोठेपणा मिरवणारेही आता दर्जाची व्याख्या स्वतःच्या सोईनुसार शिथिल करून घेऊ लागले आहेत. असे असेल तर उगीचच भाषा नष्ट होत असल्याच्या रडकथा गाण्यात काय अर्थ ? शेवटी वृत्तपत्र हा भाषेच्या सार्वत्रिकीकरणाचा महत्त्वाचा आधार असतो. तोच असा भुसभुशीत होऊ लागला तर व्यापारी किंवा अशिक्षितांकडून कसलीच अपेक्षा करता येणार नाही.

अर्थात, परखडही (व आपण सारेच जण) या म्हणण्याशी सहमत आहेत, असे त्यांचा प्रतिसाद पाहता म्हणता येईल.