पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
डोंबिवली-कल्याणमध्ये ऑटोरिक्षांसाठी मीटर पद्धत लागू करण्यासाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आरटीओ अधिकाऱ्यांनी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याऐवजी ‘खोटे बोल पण रेटून बोल’ असे सांगत स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेतली. डोंबिवलीत सर्व आलबेल असल्याचा जावईशोध लावत ‘डोंबिवली पॅटर्न’ची सर्वत्र अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मतही या बैठकीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मात्र ‘डोंबिवली पॅटर्न’ म्हणजे मुजोर रिक्षाचालकांनी मनाला येईल तसे भाडे सांगणे आणि ते प्रवाशांनी निमूटपणे देणे, असाच असल्याचे चित्र डोंबिवलीकरांना सध्या अनुभवास येत ...